माझी कविता

Started by Asu@16, July 08, 2016, 01:27:16 PM

Previous topic - Next topic

Asu@16

माझी कविता

माझी कविता, रंगी बेरंगी गोधडी.
मातीचा तिला वास आहे, आकाशाचा ध्यास आहे.
विषयाचे तिला बंधन नाही, बस्स ! हृदयाचे स्पंदन आहे.
मनाच्या हुंकाराने तुमच्याशी साधलेला संवाद आहे.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita