बालपण गेलं हरपुन...!!

Started by Balaji lakhane, July 09, 2016, 12:02:38 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

दफ्तराचं ऒझ खुप झालं
माझं बालपण हरपुन गेलं ...
पाठीवर पोत खेळण्याच्या वयात
शाळेच्या बंधनात बालपण गेलं...!!

जन्मुन झाले दोन वर्ष
घातले मला इंग्रजी शाळेत...
मन मारून शाळेत सोडले
सुख हेरले चिमुकल्या वयात...!!

सगळे माझ्या भावनांशी खेळतात
ग्रूहपाठ खुप बाई देतात...
त्यात जाते दिवस निघुन
चुक झाली छडीने मारतात...!!

डोळ्या मधुन अश्रु पडतात
अश्रुच्या सरीवर सरी वाहतात...
यात जाते माझे बालपण
सर्व मला दुःखच देतात...!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304