जीवन

Started by पल्लवी कुंभार, July 09, 2016, 12:02:05 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

हसत्या खेळत्या लाटांची, झालर स्तब्ध किनाऱ्याला
गलबत झाले दिशाहीन, उसळला सागर क्षणाला
का सुटले सारे पाश, भिडता बोचऱ्या सत्याला
घेई ठाव हे मन, पाहता सत्य की मोहाला?
दिसे आशेचा किरण, दिसता मृगजळ तृषार्थाला
जीवन ऐसे नाव, न सुटणाऱ्या कोड्याला

~ पल्लवी कुंभार