एक लेख मुलांबद्दल

Started by Akshay @stillwaiting4love, July 10, 2016, 06:49:19 AM

Previous topic - Next topic

Akshay @stillwaiting4love

visit & hit 👍-
https://www.facebook.com/stillwaiting4love/

*एक लेख मुलांबद्दल..*
मुलींनो, माहिती करून घ्यायचंय मुलांच्या भावना..??
तो मुलगा आहे एखादं यंत्र नाही, तुम्ही त्याचं मन दुखवलं, ह्रुदय तोडलं.. आणि तरीही आनंदात आहात.. तो काहीच म्हणत नाही, कारण तो तुमच्यावर खुप प्रेम करतो.. तुम्हाला माहित नसतात त्याच्या अश्रुंनी आणि वेदनेने भरलेल्या रात्री.. तुम्हाला माहित नसतं जेव्हा तो घाबरून भीतीने झोपेतुन जागा होतो जेव्हा तुम्हाला स्वप्नात बघतो.. तुमचा विचार यायला नको म्हणून तो मित्रांच्या घोळक्यात राहतो.. तो स्वतःचं मन वळवण्यासाठी स्वतःला कामांमध्ये व्यस्त करण्याचा प्रयत्न करतो पण तरीही तुमच्या आठवणींपासुन तो दुर जाऊ शकत नाही..
एक मुलगी कसं एवढं दुःख देऊ शकते त्याला.. कधी कधी त्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही.. आणि तो जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा त्याचे मित्रच त्याला धीर देतात.. ह्या सगळ्यांबद्द्ल त्याच्या घरातल्या लोकांना काहीच माहिती नसतं.. तो दुःख लपवुन चेहर्यावर एक खोटं हास्य ठेवतो.. पण त्याच्या ह्रुदयात मात्र विरहाचं दुःख भरलेलं असतं.. त्याच्या वेदना कोणालाच दिसत नाही.. कारण त्याच्या डोळ्यांत आसवं नसतात.. तुम्हाला वाटतं तो कधीच रडत नाही.. त्याच्यात दुःख सहन करण्याची ताकद आहे... पण.. त्याला सुद्धा भावना आहेत.. त्याला सुद्धा मन आहे.. तो सुद्धा रडतो.. पण कुठे तरी एकांतात.. कारण.. तो मुलगा आहे..
Dear Girls respect boys too.. They do a lot for us as a brother, father, friend & partner..

(सर्व मुलींनी वाईट वाटुन घेऊ नये)
-अक्षय
visit & hit 👍-
https://www.facebook.com/stillwaiting4love/