क्षण

Started by गणेश म. तायडे, July 10, 2016, 09:28:04 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

हृदयी साठवूनी
आरास आठवणींची
वेचतो क्षण सुखाचे
आपल्या सहवासाची
वेडावले क्षण का?
भारावून मन गेले
विसर तुझा कसा होई?
मणी आठवणींचे ओवलेले
क्षण तुझ्या माझ्यातले
का भंगूर होत गेले
स्पर्श करता जिवाला
हक्क माझे हिरावले
स्वप़्नात रोज तु येई
नकळत दुर घेऊनी जाई
क्षण भेट देऊनी मज
पापण्यांत लपवून ठेवी

-गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com

Shrikant R. Deshmane

क्षण तुझ्या माझ्यातले
का भंगूर होत गेले
स्पर्श करता जिवाला
हक्क माझे हिरावले
स्वप़्नात रोज तु येई
नकळत दुर घेऊनी जाई

masta aahe.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]