दे धक्का...! उदात्तीकरण

Started by शिवाजी सांगळे, July 10, 2016, 08:55:25 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

उदात्तीकरण

महात्मा होतो, पुजला जातो
अतिरेकी व्हा महात्मा व्हाल,
जीवंतपणी पुजले जाणारच
उदात्तीकरणाने शहीद व्हाल!

स्वस्त आहे येथे शहीद होणं
दुश्मन परका होता, काळ गेला,
स्वातंत्र्यात या अस्तित्वा साठी
आपलाच तो, का दुश्मन झाला?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९