तुझे भिजणे...

Started by गणेश म. तायडे, July 11, 2016, 02:56:38 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

नको भिजू पावसात
आग काळजास लागे
थेंब तुझ्यावर ओघळणारा
मला चिडवून पाहे
तुझ्यासोबत मला ही
चिंब भिजायचे आहे
होवून पाणी पाणी तुजसाठी
तुला भिजवायचे आहे
थेंब तुझ्या ओठांवरचा
होवून मला रहायचे आहे
गारवा चिंब केसातला
अंगी शहारून जात आहे
न्हाऊनी पावसात तु ही
फुलांपरी उमलत आहे
होवूनी भुंगा मी ही
तुझ्या भोवती फिरत आहे
गंध मोहक किती तुझा
ओढ मनास लावत आहे
भिजणे तुझे पावसातले
येड जीवा लावत आहे

-गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com