घ्यावा काय बोध आपण

Started by haresh1979, July 11, 2016, 05:15:02 PM

Previous topic - Next topic

haresh1979


घ्यावा काय बोध आपण? वाचुन कविता फक्त मस्त म्हणायचं, पुन्हा मुलांशी फक्त इंग्रजीतून बोलायचं,
केळाचं झाल बनाना, आईला मम्मी, अन् बाबांचा डँड म्हणून शिकवायचं,
वाचुन कविता फक्त मस्त म्हणायचं,

आपली आजी होते आई अन् आजोबा होतात बाबा,
भाऊ होतो ब्रदर अन् ताई होते सिस्टर,
वाचुन कविता फक्त मस्त म्हणायचं...

इंग्रजीचा झाला सैराट,
अन् मराठी भाषेची लागली वाट,
इंग्रज गेले अन् देऊन गेले ही खैरात,
मराठीच्या उरावर बसली आपल्या घरात,
घराला आता स्विट होम म्हणायचं,
वाचुन कविता फक्त मस्त म्हणायचं...
____शेखर (हरेश)

Sent from RediffmailNG on Android