वेदना आणि आँसू

Started by श्री. प्रकाश साळवी, July 14, 2016, 04:02:04 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

वेदना आणि आँसू
---------------
आसवांना माझ्या कुणी थांबवा रे
वेदनांना माझ्या कुणी समजवा रे
तू वेडी अशी माझ्या या आसवांची
हळूवार कुणी वेदनांना जोजवा रे
पाहीलेस का कधी तू ढग आसवांचे?
या वेदनांना कुणी हलकेच बरसवा रे
कुणी पाहीले का माझ्या हरवल्या वेदनांना
आसवांना हलकेच कुणी बोलवा रे
आहेत आँसू माझे दिवाणे तुझ्या वेदनांचे
या वेदनेला हलक्या स्वराने कुणी आळवा रे
असतिल आँसू जिथे थवेच वेदनांचे
हसणा-या वेदनांनी आँसू असे संपवा रे
**
प्रकाश साळवी✍