दे धक्का...! खड्डे किमया

Started by शिवाजी सांगळे, July 14, 2016, 05:53:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

खड्डे किमया

खड्यांची किमया सारी
ठेकेदार भरतो तिजोरी,
घेते मोडून हाडे नित्य 
जनता सामान्य बिचारी!

खड्या भोवती अर्थकारण
लोकप्रतीनिधी त्या कारण,
कर वसुली करूनी सारी
का न हो समस्या निवारण?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९