काहूर भावनांचे. .................

Started by Ashok_rokade24, July 16, 2016, 12:05:27 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

काहूर भावनांचे , मन नित जळत आहे ,
न देती साथ कुणी, वाट तुझी पहात आहे ,
महापुर वेदनांचा दाही दिशी अंधकार ,
नाते जुळले भावनांचे तुच दिला आधार ,
मुक तुझे आसू साद ही ह्रदयाची ,
पाऊले अडखळली सोडली वाट अंताची ,
शब्दांने तुझ्या मिळे आधार जगण्याला ,
दिसण्याने तुझ्या फुटे पालवी मनाला ,
डोळ्यात तुझ्या पहाता भान हरपून जाते ,
ऐकून तुझे हासू सारे दुःख विरून जाते ,
एक एक अदा तुझी नित आठवत रहाते ,
घेण्या भेट तुझी मन अधीर होते ,
परी पाळून बंधने सारी मना नित आवरीतो ,
तरीही वळणावर अखेरच्या वाट तुझीच पहातो .
तरीही वळणावर अखेरच्या वाट तुझीच पहातो ॥

                                            अशोक  मु. रोकडे .
                                             मुंबई.