साद...............

Started by Ashok_rokade24, July 16, 2016, 12:12:10 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वर्षा मागून वर्षे ऊलटली परी,
भावना मनीची ओठी न आली ,
हात आधाराचा मज हवा ,
मन माझे साद तुज घाली ,

अनेक आठवणी गोड सुगंधी ,
मनापासी ठेविल्या जपूनी ,
नित्य आठव तुझा करितो,
तगमग जीवाची अती जाहली ,

हात आधाराचा मज हवा ,
मन माझे साद तुज घाली ,

अवती भवती काळोख दाटला ,
तनामनाचा धीर पुरता खचला ,
दुर्दैवाने ही डाव  साधला,
वाट सुखाची हरवून गेली ,

हात आधाराचा मज हवा ,
मन माझे साद तुज घाली ,

तुझे हासणे नित आठवते ,
बोलणे पाहणे मना फुलविते,
जर्जर मना नव पालवी फुटते ,
साथ हवी निराशा अती झाली ,

हात आधाराचा मज हवा ,
मन माझे साद तुज घाली ,

कठीण समयी साथ लाभली ,
शब्दांनी नवी दिशा मिळाली  ,
आता पुन्हा  ती साथ हवी ,
म्हणून तुजला साद घातली,

हात आधाराचा मज हवा ,
मन माझे साद तुज घाली ,
         
                   अशोक  मु. रोकडे.
                    मुंबई.