निर्धार

Started by रेनी, July 16, 2016, 10:56:46 PM

Previous topic - Next topic

रेनी



हवे फुल, मग मान्य आहे काटा
ठरली दिशा, मग गवसतील वाटा

हा प्रवास आहे खडतर
ह्या प्रवासात नसेल कोणताच जर तर

अशक्यतेलाही असते शक्यतेची आस
हे कळताच जन्माला येतो ध्यास

अपयश ह्या शब्दातच ज्यांना यश दिसले
बस एक निर्धार, अन सारे पाश तुटले

एक आयुष्य, एक निर्धार
न वाचता गीता, कळले सारे सार

Shrikant R. Deshmane

survatch khup masta zali kavitechi,
aavdli kavita.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]