निर्भया

Started by Asu@16, July 17, 2016, 10:26:14 AM

Previous topic - Next topic

Asu@16

       निर्भया

मद्यधुंद नयन अंगारे
जाळीत होते त्रिभुवन सारे
तशात दिसली सुंदर हरिणी
खेळत होती हिरव्या कुरणी
घेरूनि त्या अल्लड तरुणी
करिती लांडगे विपरीत करणी
पाहुनी असहाय, केविलवाणी
त्वेषे गाती बिभत्स गाणी
जाळ्यात कधी चुकुनि पडता
होती गरीब बापुडवाणी
फुशारक्याही तरी मारिती
निर्लज्ज, नराधम, दीड शहाणी
नकोच शिक्षा कैदेची
सुधारण्याची भिक्षा कैची !
वासनांध हे लिंग पिसाट
छाटा यांचे लिंग सपाट
पुरुषार्थाचे लिंग झडू दे
जखम लज्जेची तशीच सडू दे
अद्दल घडू दे दुष्कर्माची
जिवंत मरणे जगण्याची
पुरुषा नाही लिंग शुचिता
फिरती मोकाट, नारी भोगिता
नाही नारी भोग्य, पतिता
विसरा आता योनी शुचिता
सीता, सावित्री आणि उर्मिला
नका आठवू वंद्य अबला
निर्भया तू अवतार सबला
दानव वधण्या जगी प्रकटला

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita


spatankar_13

Changli jamun aali aahe kavita.shabd chaan julale aahet. Mi pan ashich ek keli hoti Nirbhayaas shrdhanjali mhanun May mahinyamadhye aani post keli hoti Esahity var aani nantar marathi kavitaanche maaheghar var june mahinyaamadhye. Malaa shabdrachanaa aavadali tumachi.

spatankar_13

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !

siddheshwar vilas patankar

वरील अभिप्राय माझा नाही आहे . हा अभिप्राय माझया नावाने कोणी पोस्ट केले आहे ते कळेल का ?

मी फक्त कविता वाचून माझे मत मांडले होते , आणि नंतर पाहतो तर हा दुसरा अभिप्राय "आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! " कोणी तरी माझ्या नावाने पोस्ट केला आहे . हे ह्या साहित्य मंडळामध्ये काय चालले आहे  तेच कळत नाही . एम . के . ने याची दाखल घ्यावी हि विनंती .

मी फक्त माझया कवितेसारखी कविता वाटली म्हणून माझे मत मांडले होते . माझी कविता जी मी इतर वेब साईटवर मागील मे महिन्यामध्येच प्रसिध्द झाली होती आणि कॉपी राईट साठी पाठवली होती ती अशी आहे

Selected post May 27, 2016; 6:24 pm  कविता :: II निर्भयास श्रद्धांजली II

वाट  अंधाराची होती

सोबत मित्राची होती

ललना उभी होती

वाट  पाहत वाहनाची

विचार अनेक मनात

संशय बळावी अंधारात

इकडे तिकडे पाहि

काय असे पदरात

वेळ पुढे जात राही

वाहन काही येत नाही

घरी जाऊ कसे ?

काहीच सुचत नाही

दूरवर दोन दिवे दिसतात

आतल्या आंत जाग्या होतात

भावना त्या मनातल्या

दिवे ते वाहनाचेच असतात

रस्ता शोधायला

वाहन जवळ येते

ललना चढते हात धरुनी मित्राचा

बघते अन घाबरते

इथे केवळ इन मीन चार माथे

वाहन सुरु होते अन मग

सुरु होते एक पाशवी प्रवास

ललना धास्तावते

जवळ येता दोघांसी बघून
 
मित्र बळ एकवटतो पण
 
कमी पडतो एकटा म्हणून

फेकुनी त्यास बाहेर

त्या निर्जन स्थळी

हाणली अबलेच्या माथी

एक पोलादी सळी

त्या निबिड अंधारी

क्रौर्य वाढे असुरी

नराधमांनी इतके लचके तोडले

कि क्रौर्यहि त्यापुढे ओशाळले

निर्जीव निपचित ती ललना

करी नाना क्षमा याचना

न कळवळा ना कसला ताप

त्या माजुरी असुरी चौघांना
 
देह्भुक भागता, समजुनी केर

फेकून दिले ललनेस बाहेर

पोलिस , पत्रकार , जनतेस

न्यायदेवतेस मिळे

जणू कायद्याचा आहेर

निर्भया शोषानोक्त अर्धी जाहली

त्यातच तिने मान टाकली

खडबडून जाग येई

मग जगाला

बने मत सारे

कायदा असावा लढायला C


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

हा माझया नावाखाली ज्याने कुणी अभिप्राय मांडला त्याने माझी जाहीर माफी मागावी हि नम्र विनन्ती .
सिद्धेश्वर विलास पाटणकर C