स्वप्नपरी माझी नखरे वाली...!!

Started by Balaji lakhane, July 17, 2016, 01:08:27 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

हि गोरी गोरीपान पोरगी
खुपच आहे ति नखरेवाली...!
तोरा आहे तिला सौदंर्याचा
म्हणुन आहे ति नखरे वाली...!!

स्वर्गातली अपसरा समजते स्वतःला
काजळ लावते गोऱ्या गालावरी...!
म्हणते मला तु पाहीलास कितीही
मला दिष्ट नाही लागणारी...!!

मुखडा तिचा छानस गोडस
तिचा गोड मिठ्ठूवाणी आवाज...!
करते ति मला खुपच बेभान
फिराय लावते मला तिच्या गोल...!!

मनाची ति खुपच गोड पोरगी
म्हणुन मनावर माझ्या राजकरी...!
इंद्रधनुष्याचे रंग भरले जिवनात
म्हणुनच म्हणतो तिला माझी स्वप्नपरी...!!

पहील्याच भेटीत माझे देह विसरले
तिच्यात माझे जिवन समावले...!
मनाशी मन आमचे जुळताच
आमच्या दोघांचे प्रेम बहरले...!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या ह्रदयाच्या राणी साठी हि कविता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

स्वर्गातली अपसरा समजते स्वतःला
काजळ लावते गोऱ्या गालावरी...!
म्हणते मला तु पाहीलास कितीही
मला दिष्ट नाही लागणारी...!!

lai bhari..
khupch aavdla he..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]