आठवतय का तुला.

Started by Dnyaneshwar Musale, July 17, 2016, 10:32:30 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आठवतंय का तुला
मी विसरलो होतो मला
जेव्हा पाहिलं होत तुला,
तोच दिवस आज
पुन्हा मला वेडावुन गेला.

माझी सकाळ दुपार
तु असायची
तुला आठवुन झाडाखालची फुलं
तुझ्या नावाने वेचायची,
प्रत्येक नाजुक पाकळीत
मला तु भासायची.

घेतलेला श्वास  ही
पचत नव्हता
तुझ्या शिवाय माझ्या
ह्रदयाला तो पोचतचं  नव्हता,
तुझ्या एका भेटीने
मला जगवणारा सहवास होता.

काळोखात चांदणीने
लखलखाट झालाय
हे मला समजलं होतं,
दिवसा ही अंधार होतो
हे तु गेल्यावर समजलं होतं
तुझं माझं एक अधुरचं नातं होतं.

मला ही काही करता आलं नाही
जखडलेला होतो मी पुर्ण,
आठवण येते तुझी
म्हणुन वाहुन टाकतो लेखणीतुन
तुझ्या आठवणीतले दिवस संपुर्ण.