अनाथ

Started by TEJASHREE KAMBLE, July 18, 2016, 09:01:58 PM

Previous topic - Next topic

TEJASHREE KAMBLE


ज्याला नाही नातं
त्याला जग म्हणतं अनाथ,
कोणी कधीही उठतो,
पाठीत घालतो लाथ,

भाऊ -बंधू सख्खे सोयरे,
यांनी ना दिली कधी साथ,
म्हणून उपाशी पोटावर पडेल आडवा हात,

दुखलं -खुपलं तर सांगताही आले नाही,
साथ पिढयांना नकाराची साथ,
तोंड वर करून बोलायची कधी,
संधीही मिळाली नाही ,

कारण सगळेच म्हणतात,
तू आहेस अनाथ....
तू आहेस अनाथ ..... 

                               तेजश्री कांबळे 
                        ( ठाणे, लोकमान्य नगर )