***** प्रेयसी माझी *****

Started by Shri_Mech, July 18, 2016, 11:07:35 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

प्रेयसी माझी


लावते वेड जीवाला
हुरहूर लावते मनाला
वेग देते आठवनींना
प्रेयसी माझी.....


ग्रीष्मातही मला भिजवते
थंडीत प्रेमाची ऊब देते
श्रावणात स्पंदनं वाढवते
प्रेयसी माझी....


रोज गुलाबी स्वप्न फुलवते
रूपाने तिच्या मुग्ध करते
जीवनात या रंग भरवते
प्रेयसी माझी.....


मग कधी अचानक....


विचार करायची शक्ती संपवते
जगण्याची गती थांबवते
सुखाला आयुष्यातून उठवते
प्रेयसी माझी....


हृदयास पिळवटते
विरहाचा जाळ पसरवते
डोळ्यातील अश्रू संपवते
प्रेयसी माझी.....


पण कशीही असली तरी,
माझी 'जान' आहे
प्रेयसी माझी....

Shri_Mech
Shri_Mech

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]