II तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय II

Started by siddheshwar vilas patankar, July 19, 2016, 03:49:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

माझं मन बी बोन्साय केलंय

त्ये पयलं होतं धरणावाणी

त्यात मॉप होतं पाणी

रंगीत मासळी पवत होती

मस्त लव्हाळं झुलंत होती

त्या समद्यासनी मारून टाकलंय

मॉप पाणी बी  आटवून टाकलयं

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

माझं मन बी  बोन्साय केलंय II

आता फगस्त तुझ्यासाठीच झुरतोय

अन घरामन्दिचं मुरतोय

गप गुमान कामावर जातोय

अन तू सांगशिल त्येच करतोय

राणी मुरून अर्धा झालोय

आता म्या पण बोन्साय झालोय II 

पयला होतो म्या ताडावाणी

दिस  रात एक मज होते

मनी तारे लखलखत होते 

खायचो कोंडा अन प्यायचो पाणी

चउत भाकरीने बाजार केला

आत्ता जन्माचा झालो अडाणी II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Shrikant R. Deshmane

खायचो कोंडा अन प्यायचो पाणी

चउत भाकरीने बाजार केला

आत्ता जन्माचा झालो अडाणी

chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C