आल्या क्षणांना...

Started by श्री. प्रकाश साळवी, July 19, 2016, 08:18:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आल्या क्षणांना...
--------------
आल्या क्षणांना मी ऊधळीत गेलो
तारे हे जीवनाचे मी जमवित गेलो
**
तुजकडे पाहता दिसे बट लाजलेली
नकळत मलाच   मी सावरीत गेलो
**
कितीतरी शहाणे पाहीले किती अडाणी
शाळा जीवनाच्या किती मी शिकवित गेलो
**
नववधू लाजरी मेहंदी तुझी ही लाजली
मेहंदिच्या पर्णांना या मी लाजवित गेलो
**
अशा धुंदधुंद रात्री अशी धुंद नशा ही
प्रणय फुलांना असा मी फुलवित गेलो
**
ऐकला गंधार आज मी पुन्हा गंधाळलेला
मैफिलीत स्वरांच्या मी ऐकवित गेलो
**
या श्रावण सरींना सुवास मारव्याचा
सरीत पावसाच्या मी मोहवित गेलो
**
प्रकाश साळवी ✍

Shrikant R. Deshmane

ऐकला गंधार आज मी पुन्हा गंधाळलेला
मैफिलीत स्वरांच्या मी ऐकवित गेलो

masta aahe prakashji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

प्रकाश साळवी