ती आणि कविता

Started by गणेश म. तायडे, July 19, 2016, 08:38:49 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

तिला माझ्या कविता आवडतात
आणि मला कवितेतली ती
कवितेत ती स्वतःला शोधते
आणि मी तिच्यात कविता शोधतो
कळत नकळत शब्द जुळतात
भावना अलगद स्पर्श करतात
तिला कवितेतला साधेपणा भावतो
तिचा भाव मला बरेच काही सांगतो
कवितेत ती नकळत हरवून जाते
शब्दांत माझ्या ती गुंतूनी रहाते
तिच्या वाचण्या मिळे कवितेला स्वर
शब्द लेखणीतून वाहती ओठांवर
अर्थ लाभतो कवितेस तेव्हा
हसू येई तिच्या गाली जेव्हा

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]