शब्दांची जादू

Started by Vivek.j, July 19, 2016, 11:16:32 PM

Previous topic - Next topic

Vivek.j

जादू ही शब्दांची
न उमगणाऱ्या अर्थांची
हळूवार फुकंर घालणाऱ्या झुळकेची
नकळत मिळणाऱ्या सुखांची
नाजूक मोजक्या क्षणांची
जपलेल्या आठवणींची
उलगडणाऱ्या गणित़ांची
छोट्याश्या आयुष्याची
प्रत्येकामध्ये लपलेल्या लहानग्याची
हरवले्ल्या आईच्या कुशीची
दमलेल्या बाबांच्या खांद्याची
क्षणात बदलणाऱ्या नशिबाची
विखुरले्ल्या प्रेमाची
गवसलेल्या जाणिवेची
जादू ही लपलेल्या निरागसतेची
एकांतात निघालेल्या प्रवासाची
मिळालेल्या योग्य वाटेची
ओळखलेल्या मनाची
बागडणाऱ्या फुलपाखरांची
जादू ही उमललेल्या फुलांची
जादू ही धूसर धुक्यांची
पावसातील मुक्या धारांची
जादू ही शब्दांची
न उमगणाऱ्या अर्थांची
माडंलेल्या शब्दरूपी कवितांची
जादू ही शब्दांची

               :- विवेक जाधव