आयुष्य .... थोडे अजून जगायचे आहे…!!

Started by Archana...!, July 20, 2016, 03:06:26 PM

Previous topic - Next topic

Archana...!

आयुष्य. ....थोडे   अजून  जगायचे   आहे. ...!!

     हसायचं  आहे, थोडे  रुसायचं   आहे,
     ओघळणार्या  आसवांना  माझ्या,  मलाच  पुसायचे  आहे,
     निसटनार्या  क्षणांना,  डोळे  भरून  पाहायचे  आहे....!!
आयुष्य. ....थोडे  अजून  जगायचे  आहे. ...!!

     आजवरची पाऊलवाट, अवघड  होती  फार,
     खचले मन कित्तेकदा , पण   मानली  नाही हार,
     अडखळणाऱ्या  पावलांना , माझे  मलाच  सावरायचे  आहे ,

आयुष्य .... थोडे अजून जगायचे आहे...!!

अर्चना...!!