आई ग आई

Started by Sunil Gudadhe, July 20, 2016, 04:05:45 PM

Previous topic - Next topic

Sunil Gudadhe

  *****आई गं आई *****
आई गं आई
कमाल तुझी बाई
पहाटे उठतेस
सडा तू टाकतेस
रांगोळी काढून
डबा तू करतेस
घाईघाईने काम करून
पाणी तू भरतेस
धुणी - भांडी करून तू
दळून  ही आणतेस
आजारी असतांना कुणी
रात्रभर जागतेस
सकाळचे जेवण २ वाजता करतेस
३६५ दिवस कधी
तुला सुटी नसतेच
सगळ्याची नेहमी
काळजी तू करतेस
मात्र, स्वतःची तब्येत
सांभाळत नाहीस
जरासा कधीही
आराम करीत नाहीस
आई ग आई
सांग जरा बाई
एवढे सगळे सांग
कोणत्या ऊर्जेने करतेस
एवढे सगळे करुनही
  तू माझ्यासाठी उरतेस
  तू माझ्यासाठी उरतेस

                                                 *** ******
सुनिल गुडधे
८८०५०२९४९६