आयुष्याच्या वाटेवर...

Started by avadhutkashid91@gmail.com, July 21, 2016, 09:41:54 AM

Previous topic - Next topic

avadhutkashid91@gmail.com

तुझं असं काय आहे माझ्यापाशी
मला अजून नाही समजलं ग
तू माझ्या मनात घर करून राहिल्याचं
कारणही नाही समजलं मला
कुणाच्या कोर्टातून हक्क आणलास
काय माहीत माझ्या हृदयात राहण्याचा
पण या हक्कासाठी माझच हृदय वकील म्हणून
वापरलस तू
जेव्हा माझी वेळ आली वकील
द्यायची तेव्हा त्या कोर्टाची दारं सुद्धा बंद
केलीस तू
अन आता मला वकील द्यायचा नाही
तरीही कोर्ट मागे लागलय.... आयुष्याच्या वाटेवर
                              --avadhut kashid