गुरुपौर्णिमा

Started by पल्लवी कुंभार, July 21, 2016, 10:33:46 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

जमलोय सर्व आज, पौर्णिमेला
वंदन आमुचे गुरुजनांना !!

आयुष्याच्या या टप्प्यावर, मी भक्कम उभा
कारण धरला होता, तुम्ही हात आमचा

एक उनाड-अजाण, होतो बच्चे आम्ही
घडलो सुजाण, तुमच्या आशीर्वादांनी

केली सुरुवात, हातचा वजाबाकींनी
हिशोब चुकतो, आयुष्याच्या घडामोडींनी

नव्हती ठाऊक तेव्हा, उत्तरं प्रश्नांची
दिल्या कित्येक परीक्षा, जेव्हा खेळलो जीवनाशी

होता तुमचा हात, आमच्या पाठीवरी
म्हणूनच जिंकलो आम्ही, कसोटी प्रसंगांची

~ पल्लवी कुंभार

अंकित उंबरे

खूप छान. जर तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमची कविता पोस्ट करू शकतो का? कृपया आमचा पेज ला भेट द्या
www.facebook.com/asachsuchlel