दे धक्का...! पाळायचे नियम?

Started by शिवाजी सांगळे, July 21, 2016, 05:43:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पाळायचे नियम?

दुसर्‍यांनीच नियम पाळावेत
असाच प्रत्येकाचा हट्ट असतो,
स्वार्था आड कोणी गेला तर
तो अधिकारी नकोसा ठरतो!

सुधारणा व्हायला हवी तर
नियम हे पाळावेच लागणार,
मोडून नियम असे, अधिकारी
यंत्रणा मग कशी चालवणार?

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९