ललित कुमारचे शब्द,।।।

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:47:13 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

"टिकून राहिले पाहिजे,।,,

आगीमध्ये बर्फासारखे थंड झाले पाहिले,,
बर्फामध्ये आग लागून बंड केले पाहिजे,!

जरी असेल ती लाट खोल सागरात लोटत
किनाऱ्याला नजरेत कायम ठेवले पाहिजे,!

मोसमात असेल सूर्य चालू देत नसेल वाट,,
चांदण्याच्या सोबत ठिकाण शोधले पाहिजे,!

करी वारा धूळ उडवून भटकवण्याचा प्रयत्न
मागे न वळता सरळ तुफान चिरले पाहिजे,!

अशी काही प्रक्रिया करून त्या खडकावर,,
उन्हाळ्यात पेरून बियाणे उगवले पाहिजे,!

पावसाळी नदी नाले वाह्ये तुंबून 'ललित, सांगे
सागरावानी बारमाही टिकून राहिले पाहिजे,!

ललित कुमार।,,,,,
22/07/2016 । 1;25AM
***********************