ललित कुमारचे शब्द,,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:48:22 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कोण कोण सांगू रे तुम्हाला गुन्हेगार इथे,!
जिकडे तिकडे पहा दिसेल गुन्हेगार इथे,!

इस्टेटीच्या लालसेने तिथे आईबाप वाटले,
ते मन मनापासून तोडणारा गुन्हेगार इथे,!

बाधांवरील लढाई जिथे परंपरागत झाली,
एका रक्ताचे रक्त साडणारा गुन्हेगार इथे,!

भावाभावाच्या लढाईत ती पंचायत गाजली,
घरातच घरफोडी जिंकणारा गुन्हेगार इथे,!

त्याने असे केले मी तसे केले झाले काय,
अशात बरबादीला लागणारा गुन्हेगार इथे,!

आपसात लढूनच सर्व शक्ती जाते वाया,
एकीचे बळ न समजणारा गुन्हेगार इथे,!

आईच्या गर्भातच एका आईला मारणारा,
खूनी तो बाप आजचा मोठा गुन्हेगार इथे,!

वंश दिवा मुलगी का होऊ शकत नाही बरं?,
आधूनिकतेत परंपरा जपणारा गुन्हेगार इथे,!

वंशाचा दिवा जवा लाथांनी झोडपतो तेव्हा,
"एक मुलगी हवी,, सांगणारा गुन्हेगार इथे,!

ललित कुमार
wapp7744881103
**********************