ललित कुमारचे शब्द,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:54:03 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

आमोशेला आत्मा दिसतो,,,
सांगतात खरं दिसतो त्या वळनाला
म्हणून राती बाराला शेतातूंन,,
घराकडं निघालो,,,,,
त्याच वळनाला रानवाही सांगता दिसतो
त्याला कुस्तीत हरवले की म्हणे
सांगेल ते करातो मागेल ते देतो,।।
असे सांगतात खरं
म्हटलं आपणही काही कमी नाहीत
हरवू त्याला,,,, एकच गोष्ट मागण्यासाठी,,,
माणसाच्या सडलेल्या बुध्दीला,,,
ठिकाणावर आणण्यासाठी ,,
लढणार स्वतःलाच म्हटले,।।
शरीराने ताकदवर नसलो तरी ,,,
रक्ताच्या थेंबा थेंबा स्वतःवरील,,
विश्वासाची ताकद आहे की,,
भिडून जाईन,,,न घाबरता।,
म्हणूनच बाराला घराकडं निघालो
वळनावर येऊन थांबलो,,
अगदी सुनसान, सगळीकडे काळोख ,,,
अशा काळोखात
दिसेल रानवा नाहीतर आत्मा,।।
पाहाय वाट पाहाय वाट
इकडे पहाय तिकडे पहाय
आवाज देऊन पाहिला,,,
माझाच आवाज मलाच आला,।
क्षण क्षण कवा तास झाला,।,
समजले नाही,,,,,,
आत्माही आला नाही,।,
रानवाही आला नाही,,,,
घड्याळात पाहता बाराचे एक झाले,,।
म्हटलं आता निघाव आत्मात दम नाही,,,
परत पुढच्या आमोशेला येऊ बाराला,,
असे म्हणत,, बिडी पेटवून ,,
एक दम भरला आणि ,।।
घराकडे निघालो,,,,,,

ललित कुमार
wapp7744881103
*******************