ललित कुमारचे शब्द,,,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:55:18 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

खोटा होतो,,
हा मध्ये हा मिळवायचो,,
तेव्हा सर्वाचा मी आवडता होतो!,
थोडा विद्रोही, सत्य तोंडावर बोलणारा,,
अन्याया सरळ सरळ विरोध,,,
करणारा झालो
अन तेव्हाच मी माझ्या,,
सावली पासून दूर झालो!,
तिला माझ हे वागणं पटल नाही,
वास्तव्य आरशे विकणे पटले नाही
ती अगदी विरोधात उभी आहे
पण मी आरशाचा धंदा बंद केला नाही
सध्या गिऱ्हाईक चांगले आहेत
आरशात पाहून लाजणारे आहेत
काही पाहताच घाबरणारे आहेत
काही रडून डोळे पुसणारा आहेत
काही पुसुन डोळे रडणारे आहेत
पण गिऱ्हाईक चांगले आहेत,,
धंदा जोरात आहे ,,
कान्याकोपऱ्यात आरसाला,,।
चांगलीच मागणी आहे,,
अजून गिऱ्हाईक वाढवायचे आहेत,।,,
तर आशा आहे मिळतील,,!

ललित कुमार
wapp7744881103
**********************