कल्पनेच्या विश्वातली

Started by vikasd1809, July 24, 2016, 10:38:02 PM

Previous topic - Next topic

vikasd1809

आहेत खूप कारणे,
राहण्या तू माझ्या कल्पनेच्याच विश्वातली ‖
जेव्हा जेव्हा मी करायचो प्रयत्न ,
समोर तुझ्या येण्याचा ,
तेव्हा तेव्हा तुझ्याच भीतीने,
मंदावत असे वेग माझ्या श्वासांचा |
तरीही होती अन आहे हिम्मत माझ्यामध्ये ,
जागा तुला देण्या काळजातली |
पण न झाल्याने उद्रेक अजूनही या हिम्मतीचा ,
राहिलीस तू माझ्या कल्पनेच्याच विश्वातली ‖

घरच्यांच्या ओढीने मी,
ना कधीच केली तुझ्याशी बोलायची हिम्मत |
अन जगुनी  आता तुझ्याशिवाय ,
मी मोजतोय त्याची किंमत |
न व्यक्त केल्याने भावना ,
मी तुझ्याविषयीची माझ्या मनातली |
राहावे लागले तुला कायमचेच,
माझ्या कल्पनेच्याच विश्वातली ‖

vikas deshmukh