तुझे भास

Started by Parshuram Sondge, July 25, 2016, 12:06:51 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तुझे भास

तुझे भास होते असे  ते
का आसमंती पांगलेले
वा-याची भलतीच शीळ
गंध तुझे तिथे गंधलेले

सागराला गाज होती ग
सांजरंगी तू राधाबावरी
सावळयाची सावली तू
शोधू नको  निशब्द किनारी

मी विखरून प्राण  सारा
देहाची ग  झुलते पालखी
भास अभासाच्या हिंदोळी
फिरती तू मनी बिंदू सारखी
. . . . सोंडगे  परशुराम ,पाटोदा
. . 9673400928
Pprshu1312