~तुझ्या आठवणी~

Started by ηأκнأl η. βοlε, July 25, 2016, 06:48:03 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

तुझ्या आठवणी मनात,
घर करून राहतात...
तरीही नकळत त्या,
मनाला खुप बोचतात...

तुझ्याच नावाने मग माझी,
फिरकी त्या घेतात...
तुझ्याच विश्वात मग,
मला हळूच ठेवून जातात.

मंद वाऱ्याची चाहुल सुद्धा,
तुझा स्पर्श देउन जाते...
मग मात्र शेवटी तुझ्या,
आठवणीच ठेऊन जाते.

मनालाही नसते भान,
ते तुझ्यात रमून जाते...
नकळत स्वप्नांमधे मग,
हलकेच हरवून जाते.

Nikhil Bole
Murtizapur, dist-akola
8550951989

[img]