Balaji lakhane

Started by Balaji lakhane, July 25, 2016, 10:16:33 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

सकाळी सकाळी वर्तमानपत्र हातात,
चेहऱ्यावर निराशा अन राग येतो...!
बलात्कार ,चोरी, हुंड्यामुळे मारहान,
अश्या गोष्टीत मी रोज बैचेन होतो...!!

कधी कधी वाटते का करतात?
मानवजातीत कलंकीत काम लोक..!
रक्त सळसळत वाचून सगळं,
मग फोडावं वाटत त्याचं डोकं...!!

खुप घातले पोटात सगळं,
राजकारण फक्त झालं सत्ताकारण...!
तेच तेच मुद्दे उचलून नाहीतर
चाली सदा जातीधर्माचे राजकारण...!!

करत नाहीत जनतेची चिंता,
फक्त असतात हवेतले भाषण...!
जो तो येतो इथे फक्त अन फक्त ,
करतो जनतेचे शोषण जनतेचे शोषण .!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304