तुला इतक्यात कसा विसरणार...

Started by Shrikant R. Deshmane, July 26, 2016, 06:21:13 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

आठवतयं तुला,
आपली पहिली भेट,
कॉलेज मधे तुझ्याच मागे,
येउन बसलो थेट..

हाक मारली तुला,
नातं कही नसताना,
उत्तर तर नाहीच दिलस,
माझ्याकडे पाहुन हसताना..

मनात काही नव्हत तसं,
मैत्री हवी होती फक्त,
मैत्रीण आली तुझी बोलायला,
मग तु झाली व्यक्त..

तुझा नंबर घेतला,
अन मी झालो गप्प,
तुझ्या मेसेजने,
माझा फोन मात्र झाला ठप्प...

काही दिवसातच,
मैत्री खुप वाढली,
घट्ट मैत्री म्हणजे आपण,
अशी अनेकांनी नावे काढली..

तुझं बोलनं, रागावणं,
मनी साठवु लागलो,
नकळत का होइना,
आपण हक्कं गाजवु लागलो..

तुला कळुन चुकलं,
आता तुझं लग्न ठरणार,
न ओळखीचा असा तो,
त्याला तु वरणार...

मला तुझी सवय होउ नये,
म्हणुन दुर मला लोट्लं
तेव्हापासुन आयुश्य माझं,
विचारांनी गोठलं..

लग्न झालं तुझं,
तु गेलीस दुर,
नैत्री च्या नात्याचा बांध फुट्ला,
अन आसवांमधे आला पुर..

महीना झाला,
तरी तुझी येते आठवण,
तु जाणुन बुजुण विसरलीस तरी,
माझ्या मनात केलीये साठवण..

माझ्या साठी केलसं सारं,
तुला मी दोशी कसा करनार,
एका मुलीची मैत्री ती,
तुला इतक्यात कसा विसरणार...
तुला इतक्यात कसा विसरणार...

                         

                                                        श्रीकांत रा. देशमाने...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]