नातं पल्याडचं

Started by शिवाजी सांगळे, July 26, 2016, 06:29:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नातं पल्याडचं

मैत्रीच्या पल्याड
एक नातं असतं !

नसता पाणी कधी
शब्दांनी चिंब करतं !

पेटवायचं नसलं तरी
स्पर्शानं केवळ चेतवतं !

मनातले भाव सुध्दा
डोळ्यांतुनच बोलतं !

दुराव्याचं असलं जरी
आपुलकीचचं असतं !

जीवंतपणी जुळलेलं
अनंतात विरणार असतं!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९