तुझी भेट -१

Started by गणेश म. तायडे, July 27, 2016, 12:22:15 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

आयुष्यभर पुरेल अशी, आठवण तु माझी
वेचलेल्या क्षणांची, साठवण तु माझी
पाहूनी तुला, एक काळ निघून गेला
तुझ्यासंगे हळूच, प्रित जोडूनी गेला
आज तु जेव्हा, भेटणार आहेस मला
माझ्या मनातील वादळ, डोळ्यांत दिसेल तुला
भेटण्याची वेळ ठरली, भेटण्याचे ठिकाण ठरले
काय काय बोलायचं, एवढेच मात्र राहून गेले
वेळेअगोदरच तिथे, जाऊन उभा राहलो
तुझ्या आवडीची फुले घेऊन, तुझी वाट पाहू लागलो
आजुबाजुच्या गर्दीमध्ये, तुलाच शोधू लागलो
प्रत्येक सावलीमध्ये, तुझी सावली शोधू लागलो
न तु आलीस, न तुझा काही निरोप होता
माझ्याकडे पाहणाऱ्यांच्या, हसऱ्या नजरा होत्या
कोमेजलेली फुले सुद्धा, मनात वादळ उठवून गेली
मनातील प्रश्नांची वावटळ, वणवा मनी पेटूनी गेली
फुलांपरी माझ्या देखील, पाकळ्या गळून पडल्या
डोळ्यांतूनी आसवांमागे, आठवणी तेवढ्या राहूनी गेल्या

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com