☺️।। शोध रे स्वत्वा ।।😊

Started by SagiGharage, July 27, 2016, 08:06:26 PM

Previous topic - Next topic

SagiGharage


☺️।। शोध रे स्वत्वा ।।😊

अर्थाचे करी अनर्थ
तयाशी नाते व्यर्थ
समजोनि करी उमज
प्रितीनिष्ठ जाणो ।।

म्हणोनि केले ऐसा
बोलूनि चाले जैसा
त्यासी कारण मानावे
थोरे अंतर राखावे ।।

बोले जयांस
तयाचे करणे सव्यास..
तोचि शब्द मानी
व्यवहाराशी ।।

अंतरीचे जाण
माणिले प्रमाण
मन:शांती लाभे
जगण्याशी ।।

जिवनाशी मध्य
काय उरले साध्य
द्रव्य येथेचि जमले
मौलीक अखंड ।।

सागी म्हणे,

मग इतर काय पाहे..
असतां सर्वकाय
अंतरीचा पयले
शोध रे स्वत्वा ।।

©®

- सागी घारगे 9960450648

दि.३० मार्च, २०१६
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648