मी

Started by rpatole, July 28, 2016, 03:15:18 PM

Previous topic - Next topic

rpatole

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

कामाच्या व्यापात सतत झगडत असतो तो मी,
कुटुंबाच्या मनापासुन आनंदी चेहर्याच्या शोधात असतो तो मी
की स्वत:साठी पण आयुष्य जगायंच असतं हे विसरलेला तो मी.

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

नात्यांमधील गुंतागुंत सोडवण्यास झटत असलेला तो मी,
नात्यातील गुंतागुंत सुटत नाही म्हणुन हताश झालेला तो मी
की या गुंतागुंत सोडवण्याच्या चक्रव्युव्हात अडकलेला तो मी.

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

खुप अपेक्षा पुर्ण करायच्यात म्हणुन राबत असलेला तो मी
आप्त जनांच्या अपेक्षांची कोंडी झालेला तो मी
की या गोंधळात स्वत:पासुनच दुरावलेला तो मी.

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

नोकरी आहे म्हणुन सदैव सकारात्मक पावित्रा असणारा तो मी
बालपण हरवलं म्हणुन नकारात्मक झालेला तो मी
की आयुष्यात नक्की काय चाललंय हे न कळलेला तो मी.

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

आपल्या माणसांबरोबर आनंद दु:ख मांडता न येणारा तो मी
आपल्या माणसांबरोबर आनंद दु:ख जो वाटु शकत नाही तो मी
की आपल्या माणसांमधे आपुलकी निर्माण करण्यासाठी कुठेतरी कमी पडत असलेला तो मी.

मी म्हणजे नक्की कोण हे मला कळतंच नाही..

कवी-रुपेश पाटोळे
मीच तो कवी- रुपेश पाटोळे