ईर्षा

Started by sameer3971, July 28, 2016, 04:24:50 PM

Previous topic - Next topic

sameer3971

📌
अरेच्या! त्याच्या कडे हे आहे
मग माझ्या कडे का नाही......
ह्या ईर्षेचे औषध
मिळते का हो कोठे?

जो तो आज ह्याच आजाराने
पीडीत आहे.
त्याचा ईलाज
होईल का हो कोठे?

मानले! तो स्वभाव धर्म आहे
पण कोणात किती आहे
ह्याची मोजपट्टी
असेल का हो कोठे?

ईर्षा वेगवेगळ्या प्रकारची आहे
माझ्यात त्याच्यात सगळ्यात....
पण त्या भाषेचे पुस्तक
छापलेय का हो कोठे?

हा रोग मनुष्यालाच लागलाय
ईतर प्राणी मात्राला त्याची..
झालीय लागण असे
कळेल का हो कोठे?

स्पर्धा आणि ईर्षा ह्यातला
फरकच् नाहीसा झालाय...
निकोप मनाची सांगड
दिसेल का हो कोठे?.

ईर्षेला कवटाळून मानवाने
काय प्रगती केली..?
विध्वंस होतोय सगळा, हे
संपेल का हो कोठे?

ऊर्मी प्रत्येकात असावी
शर्यत जिंकण्याची.....
पण खेकड्याची वृत्तीत फरक
पडेल का हो कोठे?📌

समीर.........🖋🖋