आठवण

Started by sameer3971, July 28, 2016, 04:26:07 PM

Previous topic - Next topic

sameer3971

आठवण;
आपल्या मनाच्या कोपर्यात दडलेल्या
अनंत साठवणींचा असते दर्पण.....
विस्मृतीत गेलेल्या अनेक क्षणांवर
मारली गेलेली असते फुंकर......

आठवण;
कधीही यावी, कुणाचीही यावी
तिला नसते वेळ आणि काळ..
रुंजी घातलेल्या मनातील विचारांनी
ती असते घातलेली एक शीळ छान...

आठवण;
तीची, त्याची हरएक क्षणांची
एकमेकांकडे झेपावलेल्या पाखरांची
आतूरतेची नसानसांतुन आसूसलेली
ह्रदयातून ऊमलेल्या गोड मिलनाची

आठवण;
बालपणातली, कौमार्याची, तरूणपणाची
होऊन गेलेल्या अगणीत द्वंद्वांची...
वृद्धाश्रमातल्या एकाकी वृद्धांची
आश्रमातल्या ऊंबर्यावर विसावलेल्या डोळ्यातली......

समीर बापट.