सत्य असत्याचा नको विचार करुस

Started by sameer3971, July 28, 2016, 04:27:30 PM

Previous topic - Next topic

sameer3971

सत्य असत्याचा नको विचार करुस
ते एक मृगजळ आहे.
कधी ऊन्हाळ्यातले वावटळ आहे
तर कधी ग्रिष्मातला वळीव आहे.

जीवन कुणाला कळले सांग आहे
ते नुसतेच मायाजालाचा भाग आहे
आपल्या हातात काही नाही
ईथे तर कशाचाच नाही थांग आहे

नूसतीच ओशाळली नजर भिरभिरती आहे
शुष्क ओठांवरती नुसता हुंदकाच आहे
ईंद्रधनूष्य पावसातले मात्र आभास आहे
चिंब होणे फक्त डोळ्यातल्या अश्रूंत आहे

प्रेम माया राग लोभ यांचीच सरमिसळ
कधी खरे तर कधी सगळे खोटेच आहे
सत्य असत्याचा नको विचार करुस
सगळ्यामधे आईचा पाझर फक्त सत्य आहे

समीर बापट
मुंबई.