गॅरन्टीचा दिवा..

Started by SagiGharage, July 28, 2016, 06:53:36 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

गॅरन्टीचा दिवा..

जीवनाची तत्वे संपली तिथेच..
जिथे आपलीच लोकं..
आपल्याच लोकांची स्वत्वे लाथाडायला लागलीत..
कलियुगातल्या काळ्यामनांची
गोड गोंडस चेहरे आता धुसर बाष्पीभवन होऊ खरे रंग दाखवू लागलीयत..
लाथाडतो मी अशा लोकांच्या जंत्री..
काळकभिन्न प्रकाशात मिणमिणत्या या चिन्यांच्या रंगीत दिव्यांनी..
आपली गॅरन्टी सांभाळावी..
मी मात्र माटीचा दिवा बनून चिरंजिव राहीन..
जोवर आत्मरुपी तेलांनं रुई भिजतेय तोवर तरी..
शाश्वत नसल्याची खंत नाही..
गॅरन्टीची गुर्मीपण नाही..

- सागी♥♬♬ ©®
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648