तुझी भेट - २

Started by गणेश म. तायडे, July 30, 2016, 10:53:57 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

एवढ्या दिवसांनी आपण आज भेटणार होतो
लहानपणीच्या आठवणी उजळवणार होतो
पण तु नाही आलीस म्हणून काय झाले
पत्र लिहित आहे माझ्या भावनांनी भरलेले
पत्र हाती येता तुला नक्की जड वाटेल
शब्दांमागील माझी तळमळ तुला जाणवेल
लहानपणापासून ज्या भेटीची वाट पाहत होतो
तु मला विसरली की काय असं समजत होतो
आठवतो का तुला आपला लहानपणीचा खेळ
आता असे काय झाले की नाही तुला वेळ
भांडणे पण खूप केली एकमेकां सोबत
नंतर हळूच हसून यायचो सोबत धावत
आठवतात का तुला गोष्टी आपण सांगितलेल्या
चुक असो कुणाचीही माफी सोबत मागितलेल्या
तळमळ माझ्या सारखी तुला देखील होईल
पाहता पाहता मन तुझे गहीवरून येईल
तुझे डोळे पाणावतील वाचून पत्र माझे
शब्द देखील भिजतील तुझ्या आसवांमध्ये
भेट व्हावी आपली पुन्हा एकत्र व्हावे
आठवणींच्या पुरात वाहुन जावे
पत्र लिहून तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे
स्वतःला तुझ्या डोळ्यात मी शोधत आहे

- गणेश म. तायडे,
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Shrikant R. Deshmane

khup chan ganeshji..
aavdli kavita
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]