का रे, तू असा?

Started by शिवाजी सांगळे, July 30, 2016, 12:39:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

का रे, तूका रे, तू असा?

का रे पावसा तू असा?
आल्यावर कहर करतोस!
बरसु लागलास तर,
बेधुंद कसा काय बरसतोस?

आम्ही असतो घाईत
जरा दमान घेत जा,
सकाळ, संध्याकाळची
वेळ टाळून येत जा!

ठरल्या वेळी असते
आम्हा पकडायची गाडी
नेमकी तेव्हाच काढतोस
का तू आमची खोडी ?

हो, अचानक येतोस
धांदल उडवुन देतोस,
कामावर जाते वेळी
चक्क भिजवून जातोस!

माहीत आहे, तुझी ड्यूटी 
असते फक्त चार महिने,
तरीही पहात असतो
वाट तूझी आठ महिने !

तूच जीवन, तूच सर्व
नातचं असं तूझ्याशी,
सांभाळायला पर्यावरण
पाणीदार बुद्धी दे जराशी!

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९