तुझी भेट - ३

Started by गणेश म. तायडे, July 31, 2016, 01:13:15 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

मलाही तुला भेटायचं आहे
मनातील सार बोलायचं आहे
नाही येणे झाले त्यादिवशी माझे
म्हणुन काय विसर पडेल तुझे
तुला मी दुखवणार तरी कशी?
जपलेले प्रेम विसरणार तरी कशी?
शुक्राची चांदणी चंद्राची जशी
भेटीची वाट मीही पाहत आहे तशी
आठवणी तुझ्या मनी जपलेल्या आहेेत
तुझे गुलाबाचे फुल अजुन पुस्तकात आहे
हातात हात तुझ्या मला द्यायचा आहे
एकांत वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे
मलाही मनभरूण तुला पाहायचे आहे
जपलेले प्रेम तुझ्यावर उधळायचे आहे
भेटू आपण नक्की एवढे मात्र खरे
नाराज नको होऊस एकदा हस बरे
भेटल्यावर आपण ओळखायचे कसे?
लहानपणी सारखेच असेल का जसे चे तसे?

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com