😊सागीज् ㅜн๑บgнтร..☺

Started by SagiGharage, July 31, 2016, 08:53:27 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

😊सागीज् ㅜн๑บgнтร..☺

गगनाशी नाही मोज
तरी भासे चिमुटभर
तैसेची हे जीवन
सागी म्हणे ।।

बैलाशी खेटार
ओढी आकांताने फार
तैसे जगणे नको जन्मे
जगावे पुरुन ।।

चार नाणी तोला
ऐकून घेई बोला
आवडी शी संगत
मगच रंगत न्यारी ।।

अविचारी वाचा
तोडी अगणिक व्यक्ती
दाखवावी आसक्ती
शत्रूस ही ।।

पोट मारोनि कोणा
जगले आनंद
अर्धी भाकर भुकेल्या
तोचि स्वानंद ।।

पाय ओढोनि पुढल्या
काय लाभे न जाणो
सोबत न्यावे जणा
मग सगळेच जितम ।।

बोल गोडीचे
नसावे कुणा तोडीचे
हर्ष पहा तोंडी
संतुष्ट वाटे ।।

नसावा मत्सर
करावा आदर
तेथेचि माणूसपण
समजावे ।।

वृक्षापरी जिणे
मरणोत्तरी जळण
तृप्ती वाटे
सागी म्हणे ।।

शब्द: सागी घारगे♥♬♬ ©®

दि.३१ जानेवारी, २०१६
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648