ती

Started by NageshT, July 31, 2016, 09:34:50 PM

Previous topic - Next topic

NageshT

ती मला म्हणाली
आता करतोस का तु कविता
मान खाली होती
अन नाही म्हणण्यास ती कधीच डोलावली होती
ती म्हणाली का रे नाही करत
यावर आडखळत आडखळत मी बोललो
निसर्ग, प्रेम, मैत्री, भावना अन सत्य
जे दिसतं; जे असतं
या सत्यावरच करतो मी कविता
तु पण पाहिला असेल निसर्ग
केले असेल प्रेम व मैत्री
अनुभवल्या असतील त्या भावना
फक्त तुला त्याची जाणिव झाली नसेल
टोचुन ती मला बोलली

आता माझ मन माझ्याशी बोलु लागलं
वर्तमानाकडुन भुतकाळाकडे ते ओढु लागलं
भुतकाळ आता माझ्याशी बोलत होता
न समजलेले गणित तो सोडवत होता
जाणिव नसलेल्या मैत्री आणि प्रेमाची
आठवण करुन देत होता

ये बाहेर त्या आठवणीच्या स्वर्गातुन
डोळ्यासमोर हात फिरवुन ती मला बोलली
भुतकाळाकडे पाहुन तु वर्तमान घालवत आहेस
प्रेम व मैत्रीला पुन्हा एकदा विसरत आहेस
परत कर सुरवात या सर्वांची
तु कोणाच्या तरी आठवणीत राहत असशिल
अन तुझ्या आठवणीत कोणी तरी
कर सामना या सत्याचा असे म्हणत
ती पण निरोप माझा घेत होती
पुन्हा मला त्याच आठवणी ती पण देत होती
त्याच आठवणीला शब्दात गुंफु लागलो
गुंफलेल्या शब्दालाच कविता म्हणायला लागलो
                            नागेश शेषराव टिपरे
                          मो.नं:-८६००१३८५२५
                          मु.पो:-खडकी ता.दौंड
                                   जि.पुणे