***** काय असतं हो प्रेम करणं ? *****

Started by Shri_Mech, August 01, 2016, 12:10:42 AM

Previous topic - Next topic

Shri_Mech

काय असतं हो प्रेम करणं ?


कुणी नुसत्या भावनेनेच शहारतं
तर कुणी कायम आठवणीतच गुंतलेलं असतं
कुणी स्वतःच्याच धुंदीत गुणगुणत राहतं
तर कुणी एकटंच आरशासमोर बडबडत असतं


कुणी कायम फोनलाच चिकटलेलं असतं
तर कुणी कॉफी शॉपमधेच रमत असतं
कुणी सर्वकाही सांगून व्यक्त होत राहतं
तर कुणासाठी नजरेतून भेटणंच पुरेसं असतं


कुणी सहवासासाठी धडपडत असतं
तर कुणी संवादावरुनच खुश असतं
कुणाला मुक्त नात्यामधे राहायचं असतं
तर कुणाला प्रेमाच्या बंधनात अडकायचं असतं


खरंच असच असतं का हो प्रेम करणं...?
कि असतं एखादं,

मिलनाचा योगच नसणारं
कायमच प्रेमात उपाशी राहिलेलं
खरं प्रेम करुनही कदर न मिळालेलं
जन्मभर भटकूनसुद्धा प्रेमामृत न मिळालेलं......

Shri_Mech
Shri_Mech